पशुसंवर्धन


योजनेचे नाव १. जिल्हा परिषदेकडील पशु वैदयकिय दवाखाने/प्रथमोपचार केंद्ग बांधणे

कार्यान्वयन अधिकारी- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जि.प.

योजनेचा संक्षिप्त तपशिल सदर योजनेतुन जिल्हा परिषदेअंतर्गत येणाया पशुवैदयकिय दवाखाना श्रेणी१ व श्रेणी२ चे आवश्यकतेनुसार
ईमारतीचे बांधकाम व बळकटीकरण  करण्यात येत आहे.


योजनेचे नाव : २.पशुवैद्यकिय संस्थाना औषधी पुरवठा करणे.

कार्यान्वयन अधिकारी- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त / जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.

योजनेचा संक्षिप्त तपशीलः सदर योजनेतुन सर्वसाधारण क्षेत्रातील पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी१ व श्रेणी२ च्या संस्थानां औषधीचा पुरवठा करण्यात येतो त्यामध्ये जिवरक्षक औषधी ,जंतुनाशक औषधी ,खनिजमिश्रणे ,जिवनसत्वे, तसेच वंध्यत्व निवारणासाठी औषधी ईत्यादी औषधीचा सदर योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात येतो.

योजनेचा लाभ कोणास घेता येतोः सदर योजनेतुन जिल्हयातील पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी१ व श्रेणी२ या संस्थानां औषधीचा पुरवठा करण्यात येतो. जिल्हयात एकुण १७९ पशुवैद्यकिय संस्था आहेत त्यापैकी श्रेणी१ ७८ व श्रेणी२ १०१ अशा प्रकारे आहेत. यातुन पशुपालकांना आजारी जनावरासाठी औषधी घेता येते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हताः  सदर योजनेतील सर्वसाधारण क्षेत्रातील पशुवैद्यकिय संस्था श्रेणी१ यांना ७०% औषधी पुरवठा व श्रेणी२ यांना ३०% औषधी पुरवठा करण्यात येतो. याचा उपयोग पशुपालकांच्या आजारी जनावरानां होतो. यामधुन जनांवरांचे होणारे नुकसान टाळता येते. यामुळे पशुपालकांच्या पशुंचे आरोग्य अबाधित ठेवण्यास मदत होते.

योजनेबाबत शासन निर्णयः डिआयएएस २००९/प्रक्र ४३५/पदुम४ मंत्रालय विस्तार , मुंबई ४०० ०३२ दिनांक ५/०३/२०१०


योजनेचे नाव :३. पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम .

कार्यान्वयन अधिकारी- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त / जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.

योजनेचा संक्षिप्त तपशीलः पशुप्रदर्शनाव्दारे ग्रामिण भागांतील पशुंपालकांना /शेतकयांना पशुसंवर्धनाविषयी सर्वांगिण माहिती मिळावी व त्यायोगे त्यांना पशुसंवर्धनाबाबत आवड निर्माण होऊन शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणुन पशुपालनांकडे बघण्याची दृष्टी प्राप्त करुन देणे व शास्त्रोक्त पशुपालनाचा प्रसार करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

योजनेचा लाभ कोणास घेता येतोः आयोजित पशुप्रदर्शनामध्ये पशुपालकांनी आपले जातीवंत पशुधन उदा. लालकंधारी ,देवणी,जर्सी,संकरीत,एचएफ संकरीत,अशाप्रकारच्या गटनिहाय पशुंच्या विभागणीनुसार अथवा वयानूसार पशुप्रदर्शनात सहभागी होता येते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हताः  पशुप्रदर्शनात सहभागी होणाया विवीध जातीच्या प्रत्येक गटांमध्ये किमान १० स्पर्धक पशु/पक्षी यांचा सहभाग अनिवार्य राहील १० पेक्षा कमी सहभाग असणाया गटासाठी प्रथम, व्दितीय व तृतीय बक्षीस न देता उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात यावे या बाबीवर निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. पशुप्रदर्शनात सहभागी व विजयी घोषित करण्यात आलेल्या पशुंपक्षांना बक्षिस वाटप , पशुपक्षांना देण्यात येणारा चारा व पशुखादय, प्रदर्शन व प्रचार याकरिता साहित्य तयार करणे, प्रदर्शनस्थळी स्टॉल लावणे, प्रदर्शनावरील अनुषंगीक खर्च व विस्तार कार्य ईत्यादी बाबींचा समावेश राहील.

योजनेबाबत शासन निर्णयः जिवायो/२०१०/प्रक्र२९२/१०/पदुम४/ दिनांक ३०/०८/२०१०


योजनेचे नाव :४. कामधेनु दत्तक ग्राम योजना.

कार्यान्वयन अधिकारी- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त / जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. सन २०१२१३ मध्ये कामधेनु दत्तक
ग्राम योजना राबविण्याकरीता पशुवैदयकिय दवाखाना श्रेणी १ व श्रेणी२ अंतर्गत प्रत्येकी एक याप्रमाणे १७५ गांवाची निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने सर्व निवड केलेल्या गावांमध्ये पशुपालक मंडळाची स्थापना करुन ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. सदर निवडलेल्या  गावामध्ये जंतनिर्मुलन शिबीर ,बाहय किटक निर्मुलन शिबीर , लसीकरण कार्यक्रम, वंध्यत्वनिवारण शिबीरे,खनिज मिश्रणे व जिवनसत्वाचे वाटप,  वैरण बियाणे/ सुधारीत गवतांची थोंबे वाटप , सहलीचे आयोजन, दुग्धस्पर्धांचे आयोजन, निकृष्ट चारा सकस करणे प्रात्यक्षिक व नाविन्यपुर्ण उपक्रम ईत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले. त्याअनुषंगाने योजना राबविण्यापुर्वी निवड केलेल्या गावातील दुग्धोत्पादन ५५६९३ लिटर प्रतिदीन ईतके होते व योजना राबविल्यानंतर ते ६६६४९ लिटर एवढे होवुन त्यामध्ये १५९५१ लिटर प्रतिदीन एवढी वाढ झालेली आहे. तसेच तात्पुरते वंध्यत्व असलेल्या ८२३६ गायंीना औषधोपचार करण्यात आले.


योजनेचे नाव :५. दुभत्या जनावरांना खादय उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम 

कार्यान्वयन अधिकारी- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०१२१३ अंतर्गत दुभत्या जनावरांना खादय उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम राबविण्यासाठी रुपये १५.०० लक्ष
तरतुद प्राप्त होती. सदर तरतुदीतुन जिल्हयातील २५०० लाभार्थिना १००% अनुदानावर खालीलप्रमाणे सुधारीत वैरण बियाणे /सुधारीत गवतांच्या थोंबाचा पुरवठा करण्यात आला.

  • मका वैरणे बियाणे (आफ्रिकन टॉल)     २७४०५ किलोग्रॅम

  • जवार मालदांडी ३५                 ८६४० किलोग्रॅम

  • फुले जयवंत थोंबे                     २९०००० नग


 

Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME