वने

योजनेचे नांव :1. वनरोपन संवर्धन दर्जा कमी असलेल्या वनामध्ये पुर्नरोपन करणे. (24064108)

कार्यान्वयन अधिकारी – उप वनसंरक्षक वन विभाग नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : या योजने अंतर्गत रोपवनाची पुर्वपावसाळी ते पाचवे वर्षा पर्यंतची कामे करण्यांत येतात. ही कामे त्या त्या वर्षातच पुर्ण करावी लागतात व तसे केल्यावरच रोपवन यशस्वी होते. या योजने मध्ये प्रति हेक्टर 833 ट्रेंचेस खोदण्यांत येतात व प्रति हेक्टर 2500 रोपांची लागवड करण्यांत येते. लागवडी मध्ये मिश्र प्रजातींच्या रोपांचा समावेश असतो.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : वैयक्तीक लाभाची योजना नाही. तथापी वनक्षेत्रालगतचे ग्रामस्थ / मजुर यांना रोजगार मिळतो. तसेच वृक्ष लागवडीमुळे पाण्याच्या पातळीतवाढ तसेच पर्यावरण संतुलनात भर पडून त्याचा लाभ सर्वदुर जिल्हयात होतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : वैयक्तीक लाभाची योजना नसल्यामुळे आवश्यक बाबी व अर्हता या बाबी योजनेशी संबधीत नाहीत.

योजने बाबतचे शासन निर्णय : सदरची योजना सन 200304 पासुन शासनाने मंजुर केलेली आहे.

योजनेचे नांव :2. मध्यवर्ती रोपमळे (34512503)

कार्यान्वयन अधिकारी – उप वनसंरक्षक वन विभाग नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील :- वनिकरणाचा कार्यक्रम हा कालबध कार्यक्रम असुन तो राबविणे करीता रोपे तयार करणे आवश्यक आहे व ही रोपे तयार करण्या करीता रोपवाटीका असणे आवश्यक आहे. रोपवाटीकेत तयार केलेली रोपे ही वेगवेगळया योजने अंतर्गत घेण्यात येणा-या रोपवन कामावर लावण्यात येतात. याशिवाय लोकांमध्ये पर्यावरणा विषयी जागृती निर्माण होवुन त्यांना वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देण्यासाठी वनमहोत्सवाच्या कालावधीत विविध सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालये यांना रोपांचा पुरवठा करण्या करीता रोपवाटीकेत रोपे तयार करणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : वैयक्तीक लाभाची योजना नाही. परंतु समाजिक संस्था, शासकिय कार्यालये, शाळा व महाविद्यालय इ. यांना या योजनेचा लाभ घेता येवु शकतो. या योजनेतुन रोपे निर्मीती होवुन त्याव्दारे वृक्षरोपनात वाढ होऊन पर्यावरण संतुलनात मदत होते व त्याचा लाभ सर्वदुर जिल्हाभर होतो. नजीकचे ग्रामीनांना रोजगार मिळतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : वैयक्तीक लाभाची योजना नसल्यामुळे आवश्यक बाबी व अर्हता या बाबी योजनेशी संबधीत नाहीत. तरी देखील सामाजिक संस्था, शासकिय कार्यालये, शाळा व महाविद्यालय यांनी रोपांची मागणी केल्यास या योजनेतुन रोपे पुरविण्यांत येतात.

योजने बाबतचे शासन निर्णय : सदरची योजना सन 201011 पासुन मंजुर झालेली आहे.

योजनेचे नांव : 3. वनसंरक्षणाची कामे (34512503)

कार्यान्वयन अधिकारी – उप वनसंरक्षक वन विभाग नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : वनामध्ये आग लागून वनाचे नुकसान होवू नये या करीता दरवर्षी जाळरेषा घेणे आवश्यक आहे. तसेच आगीवर नियंत्रण ठेवणेसाठी टॉवर बांधणे, फाय वॉचर ठेवणे. वनाचे संरक्षण व संवर्धन करण्या करीता आगीचे मोसमापुर्वी जाळरेषेची कामे घेणे व आगीवर आगीचे मोसमात बारीक लक्ष ठेवुन ती त्वरीत विझविणे. वनाचे संरक्षण झाल्यास निसर्गामध्ये समतोल राहून त्याचा परिणाम पर्यावरणावर होणार नाही व त्यामुळे समाजाचे जीवनमान उंचावेल.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : वैयक्तीक लाभाची योजना नाही. तथापी वनास आग लागुन होणारी हानी जसे लहान रोपे जळणे, पालापाचोळा जळने, ह्युमस कमी होणे, मोठ्या झाडांना आग लागुन पोकळपणा येणे या पासुन प्रतिबंध करणचे हेतुने जाळपट्टे कापून जाळुन घेण्यामुळे वनसंरक्षणात अमुलाग्र भर पडते व पर्यावरण संतुलनासही मदत होते. ग्रामीनांना रोजगार मिळतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : वैयक्तीक लाभाची योजना नसल्यामुळे आवश्यक बाबी व अर्हता या बाबी योजनेशी संबधीत नाहीत.

योजने बाबतचे शासन निर्णय : सदरची योजना सन 201011 पासुन मंजुर झालेली आहे.

योजनेचे नांव : 4.मृदसंधारणार्थ वनिकरण कामे (44061801)

कार्यान्वयन अधिकारी – उप वनसंरक्षक वन विभाग नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : या योजने अंतर्गत रोपवनाची पुर्वपावसाळी ते पाचवे वर्षा पर्यंतची कामे करण्यांत येतात व या कामासाठी प्रत्येक वर्षा करीता मनुष्य दिवस व त्या करीता लागणाया साहित्याची टक्केवारी निश्चीत केलेले असते. निश्चीत केलेल्या मनुष्य दिवसाच्या व साहित्याच्या टक्केवारीच्या अधिन राहुन कामाची अंदाजपत्रके तयार करण्यांत येतात. ही कामे त्या त्या वर्षातच पुर्ण करावी लागतात व तसे केल्यावरच रोपवन यशस्वी होते. या योजने मध्ये प्रति हेक्टर 833 ट्रेंचेस खोदण्यांत येतात व प्रति हेक्टर 2500 रोपांची लागवड करण्यांत येते. लागवडी मध्ये मिश्र प्रजातींच्या रोपांचा समावेश असतो. ज्या गावात सदरची योजना राबविल्या जाणार आहे त्या भागातील वनक्षेत्राचा दर्जा वाढवुन पर्यावरणाचे संतुलन राखणे हा या योजनेचा हेतु आहे.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : वैयक्तीक लाभाची योजना नाही. तथापी वनक्षेत्रालगतचे ग्रामस्थ / मजुर यांना रोजगार मिळतो. तसेच वृक्ष लागवडीमुळे पाण्याच्या पातळीतवाढ तसेच पर्यावरण संतुलनात भर पडून त्याचा लाभ सर्वदुर जिल्हयात होतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : वैयक्तीक लाभाची योजना नसल्यामुळे आवश्यक बाबी व अर्हता या बाबी योजनेशी संबधीत नाहीत.

योजने बाबतचे शासन निर्णय : सदरची योजना सन 200203 पासुन शासनाने मंजुर केलेली आहे.

योजनेचे नांव : 5.संयुक्त वन व्यवस्थापन (34512503)

कार्यान्वयन अधिकारी – उप वनसंरक्षक वन विभाग नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : वनाचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे व त्यासाठी गावातील लोकांचा सहभाग देखील आवश्यक आहे. गावातील लोकांचे सहकार्य मिळविण्यासाठी गावामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. वनाचे संरक्षण व संवर्धन करण्या करीता गावातील लोकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळविणे व त्यांना त्यासाठी प्रवृत्त करणे. गावातील लोकांचा सहभाग मिळाल्यास वनाचे संवर्धन होवून वनापासून मिळणाया उत्पादनाचा फायदा हा गावातील लोकांना पर्यायाने सर्व समाजाला मिळेल.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : वैयक्तीक लाभाची योजना नाही. परंतु सदर योजनेतुन संबधीत गावातील लोकांना व समिती सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येवु शकतो. ग्रामीणांचे रोजगारात वाढ होते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : संयुक्त वनसमितीची स्थापना असणे व त्यांची बँक खाते असणे बंधनकारक, पेमेंट समिती मार्फत होते. तसेच समितीचे रजिस्ट्रेशन असणे जरुरी आहे. अर्हता या बाबी योजनेशी संबधीत नाहीत. परंतु समिती मार्फत उत्कृष्ट कामे केल्यास गावातील लोकांना या योजनेचा लाभ अधिक प्रमाणात होवु शकतो.

योजने बाबतचे शासन निर्णय : सदरची योजना सन 201011 पासुन मंजुर झालेली आहे.

योजनेचे नांव : 6.वनपर्यटन विकास / (इको टुरीझम) (34512503)

कार्यान्वयन अधिकारी – उप वनसंरक्षक वन विभाग नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : सर्व लोकामध्ये वनाविषयी आकर्षण निर्माण होवून त्यांना त्यासाठी प्रवृत्त करणे करीता निसर्ग रम्य अशा गावातील परिसराचे सुभोभीकरण करणे, त्या ठिकाणा पर्यंत जाण्यासाठी रस्ते तयार करणे, परिसरात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे या योजनेत अभिप्रत आहे. वनांचे संरक्षण व संवर्धन करण्या करीता लोकांमध्ये निसर्गाविषयी आकर्षण निर्माण होणे आवश्यक आहे. पर्यटनाचा आनंद लोकाना घेता येईल तसेच मुलांना सहलीचा आनंद घेत घेत निर्सगाचे शिक्षण मिळेल. वृक्षा विषयी माहिती मिळेल व आपुलकी ही वाढेल. लोकांमध्ये आकर्षण निर्माण झाल्यास त्याचा परिणाम वृक्ष संगोपन व संवर्धनावर होईल व अंतिमतः पर्यावरणावर होवून लोकांचे जीवनमान उंचावेल.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : वैयक्तीक लाभाची योजना नाही. परंतु सदर योजनेतुन सर्व लोकांना या योजनेचा लाभ होवुन वनांचे संरक्षण व संवर्धन करण्या करीता लोकांमध्ये निसर्गाविषयी आकर्षण निर्माण होवु शकते व लहान थोरांना निसर्ग सानिध्याचा लाभ व पर्यटनाचा आनंद मिळु शकतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : वैयक्तीक लाभाची योजना नसल्यामुळे आवश्यक बाबी व अर्हता या बाबी योजनेशी संबधीत नाहीत.

योजने बाबतचे शासन निर्णय : सदरची योजना सन 201011 पासुन मंजुर झालेली आहे.

योजनेचे नांव :- 7.वनातील ईमारती (3451-2503)

कार्यान्वयन अधिकारी – उप वनसंरक्षक वन विभाग नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : क्षेत्रीय कर्मचायांचे मनोबल वाढून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांना सुखसोयी पुरविणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचेसाठी निवासस्थानाची व्यवस्था करणे हे या योजनेत अभिप्रेत आहे. क्षेत्रीय कर्मचायांना निवासस्थानाची व्यवस्था या सारख्या सुखसोयी उपलब्ध करुन दिल्यास त्याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : वैयक्तीक लाभाची योजना नाही. तथापी वनकर्मचायांची निवास व्यवस्था करणे हे याचे उदिष्ट व त्याव्दारे प्रभावी वनसंरक्षण करता यावे म्हणुन ही योजना आहे.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : वैयक्तीक लाभाची योजना नसल्यामुळे आवश्यक बाबी व अर्हता या बाबी योजनेशी संबधीत नाहीत.

योजने बाबतचे शासन निर्णय : सदरची योजना सन 201011 पासुन मंजुर झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME