ग्रामविकास

योजनेचे नाव : १.स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना.

कार्यान्वयन अधिकारी – प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल सदर योजना दिनांक ०१.०४.१९९९ पासून सुरु झाली.  सदर योजने मध्ये दारिद्ग रेषेखालील कुटूंबासाठी स्वयंरोजगार निर्माण करुन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे व दारिद्गय रेषेच्या वर आणणे हा मुख्य उद्देश आहे. राज्य शासनाचा २५ टक्के व केंद्ग शासनाचा ७५ टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध होतो.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो: दारिद्गय रेषेखालील कुटूंबातील लाभार्थीना लाभ घेता येतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता:

  1. दारिद्ग रेषेखालील १० ते २० सदस्यांचा बचत गट स्थापन करण्यांत येतो. योजनेमध्ये ५० टक्के अनु.जाती जमाती, ४० टक्के महिला व ३ टक्के अपंग आणि १५ टक्के अल्पसंख्याक लाभार्थीना लाभ देण्यात येतो.
  2. सहा महिने पूर्ण झालेल्या बचत गटांना खेळते भांडवल शासन व बँकेमार्फत मिळून रुपये २५,०००/ उपलब्ध करुन दिल्या जाते.
  3. एक वर्ष पूर्ण झालेल्या गटांना द्वितीय प्रतवारी नंतर मुख्य व्यवसायासाठी कर्ज व अनुदान प्रकल्प किमंतीनूसार उपलब्ध करुन दिला जातो.  उदा. डेअरी,शेळीपालन, रेडीमेड गारमेट.

योजने बाबतचे शासन निर्णय केंद्ग शासनाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना मार्गदर्शक सूचना सन १९९९.


योजनेचे नाव : २.इंदिरा आवास योजना

कार्यान्वयन अधिकारी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल:  सदर योजना १ जानेवारी १९९६ पासून सुरु आहे. ग्रामीण भागातील दारिद्ग रेषेखालील बेघर कुटूंबाना स्वतःचे घरकुल बांधणेसाठी रुपये ६८५००/ अनूदान म्हणून उपलब्ध करुन देण्यात येते. राज्य शासनाचा २५ टक्के व केंद्ग शासनाचा ७५ टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. राज्याचा अतिरिक्त निधी प्रति घरकुल रुपये २३५००/ प्रमाणात प्राप्त होतो.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो: ग्रामीण भागातील सन २००२२००७ मधील दारिद्गय रेषेखालील बेघर असलेल्या कुटूंबाना लाभ देण्यात येतो

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता ग्राम पंचायत मधील कायम प्रतिक्षा यादीमध्ये समावेश असावा. दारिद्ग रेषेच्या यादीत नांव असावे, बेघर असावा, कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. त्याच गांवातील रहिवासी असावा.

योजने बाबतचे शासन निर्णयकेंद्ग शासन निर्णय इंदिरा आवास योजना मार्गदर्शक सूचना दिनांक ०१.०४.२००४ नूसार राज्य शासन निर्णय दिनांक ०९.०४.२०१० चे नूसार.


योजनेचे नाव : ३.ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर/मिनी आयटीआय,  लोहा.

कार्यान्वयन अधिकारी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल:  सदर प्रशिक्षण केंद्गात बांधकाम, पत्रे कारागीर, वेल्डर, या तीन व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्या जाते. राज्य शासनाच्या निधीतून योजना राबविली जाते.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो दारिद्ग रेषेखालील लाभार्थीना व बिगर दारिद्ग रेषेखालील लाभार्थीना सुध्दा प्रशिक्षण दिल्या जाते. दारिद्ग रेषेखालील लाभार्थीना रु. ५००/ दरमहा मानधन देण्यात येते व बिगर दा. रे. खालील लाभार्थीना मानधन न देता प्रशिक्षण देता येते.  

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता लाभार्थी हा दारिद्ग रेषेखालील असावा, वय १८ ते ३५ वर्ष, किमान नॉन मॅट्रीक असावा.

योजने बाबतचे शासन निर्णय शासन निर्णय क्र. ग्रायुप्र/१०९९/प्रक्र/६४३/४१/दिनांक ०८.०२.२०००


योजनेचे नाव : ४.पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम/ पडीक जमीन विकास कार्यक्रम.

कार्यान्वयन अधिकारी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड

योजनेचे उद्देशः केंद्ग पुरस्कृत अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, हरीयाली कार्यक्रम व पडीक जमीन विकास कार्यक्रमांखालील पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी नांदड जिल्ह्यात करण्यात येत आहे. सदरील कार्यक्रम स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा व पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत आहे. सदरील कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी केंद्ग शासन ७५% व राज्य शासन २५%  निधी याप्रमाणे उपलब्ध करुन दिला जातो. या कार्यक्रमासाठी केंद्ग शासनाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, भोकर, मुखेड व देगलूर या अवर्षण ग्रस्त तालुक्याची निवड केलेली आहे. तसेच कंधार व हदगांव तालुक्यात पडीक जमिन विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.


योजनेचे नाव : ५.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा  प्रशासन योजना.  

कार्यान्वयन अधिकारी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल: या योजनेत सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन व भत्ते, वाहनावर इंधन व दुरुस्ती खर्च, कार्यालयीन आकस्मिक खर्च केला जातो. राज्य शासनाचा २५ टक्के व केंद्ग शासनाचा ७५ टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध होतो.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो: सर्व अधिकारी / कर्मचारी, जि. ग्रा. वि. यंत्रणा कार्यालय.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता: जि. ग्रा. वि. यंत्रणा कार्यालय.

योजने बाबतचे शासन निर्णय :

१.केंद्ग शासनाचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजनेचे मार्गदर्शक सूचना सन २००२.

.महाराष्ट्र शासन निर्णय क्र. जिग्राप्र/२००३/प्रक्र १७४३/योजना ५ दिनांक १७.०३.२००४ नूसार लागू करण्यात येत आहे.


योजनेचे नाव : ६.ग्रामपंचायतीला जनसुविधेसाठी विशेष अनुदान ( दहन व दफन भुमि)

कार्यान्वयन अधिकारी – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद, नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल: नांदेड जिल्हयात १६ पंचायत समिती असुन त्यामध्ये एकुण १३११ ग्राम पंचायती आहेत. जिल्हा वार्षिक योजना सन २०१०११ या आर्थिक वर्षात या योजने अंतर्गतदहन व दफन भुमी इतर कार्यक्रम ही जिल्हास्तरीय योजना शासनामार्फत राबविण्यात येत होती. सदर योजनेअंतर्गत ग्रामिण भागातील ज्या गावात दहन/दफन भुमिसाठी ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची जमीन उपलब्ध नसेल अशा गावांच्या बाबतीत खजगी . जमीन संपादीत करण्यासाठी केवळ भूसंपादनाचा खर्व भागविण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात येत होते परंतू ग्रामीण भागात दहन /दफनभुमीचवी मागणी व यासाठी लागणाया इतर अनुषंगीक सोयी सुविधाबाबत ग्रामपंचायतीची मागणी शासनस प्राप्त होत आहे. त्यामुळे सदरची योजना विस्तारीत करुन सन २०१०११ या अर्थिक वर्षापासुन ग्रामपंचायतला जन सुविधासाठी विशेष अनुदान ही नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो:

१.ज्या गावामध्ये दहन /दफन भुमिसाठी शासकिय /ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध नसेल अशा  ग्रामपंचायती.

. .ज्या गावामध्ये दहन /दफन भुमि असुनदेखील त्याठकाणी सोयी सुविधा उपलब्ध नाहीत अशा ग्रामपंचायती.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता:

१.ज्या गावामध्ये दहन /दफन भुमिसाठी शासकिय /ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध नसेल अशा  ग्रामपंचायती.

. .ज्या गावामध्ये दहन /दफन भुमि असुनदेखील त्याठकाणी सोयी सुविधा उपलब्ध नाहीत अशा ग्रामपंचायती.

.सदर योजनेअंतर्गत हाती घ्यावयाचा समावेश गाव नियोजन आराखडयात असणे आवश्यक आहे.

.सदर योजनेअंतर्गत कामाची निवड जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येईल.

योजनेबाबतचेशासननिर्णयशासननिर्णयक्रमांकददभू२०१०/प्र.क्र./६२/.रा./ ग्रामविकासजलसंधारणविभाग, मंत्रालयमुबंई३२दिनांक१६सप्टेबर२०१०


योजनेचे नाव : ७. मोठया ग्रामपंचायतीना नागरी सुविधासाठी  विशेष अनुदान विद्युतीकरणासह

कार्यान्वयन अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद, नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल: नांदेड जिल्हयात १६ पंचायत समिती असुन त्यामध्ये एकुण १३११ ग्राम पंचायती आहेत. जिल्हा वार्षिक योजना सन २०१०११ या आर्थिक वर्षात मोठया ग्रामपंचायतीना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान विद्युतीकरणासह या योजने अंतर्गत ५००० च्या वर लोकसंख्या असुनही नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अकृषिक रोजगार व वाणिज्यिक व्यवहाराची टक्केवारी कमी असल्याने स्थापन होऊ शकत नाही. यासाठी या मोठया ग्रामपंचायतीचा आर्थीक, सामाजीक, सांस्कृतिक, औद्योगीक, कृषि औद्योगीक आणि वाणिज्यिक  विकास होण्याच्या दृष्टिकोणातून त्यासाठी प्राधान्याने  व प्राथम्याने येथील राहणीमान दर्जेदार होण्यासाठी शहराच्या तोडीच्या मुलभुत सुविधा व रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आशा मोठया ग्रामपंचायतीसाठी नगर रचना आराखडयाच्या धर्तीवर ग्राम विकास आराखडा तयार करुन जमीन वापराचे व बाधकामाचे निकष, जमीन विकासचे निकष, जमीनीचे झानिग विकास नियंत्रण नियमावली अधिनियमन सुध्दा नियोजनबध्द विकासाच्या दृष्टिने आवश्यक असल्याने त्या दृष्टीने अशा गावांचा स्वतंत्र विचार करुन सन २०१०१० या वर्षापासुन शासनाने मोठया ग्रामपंचायतीला नागरी सुविधासाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह ) ही योजना सुरु केलेली आहे.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो:

  1. ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या ५००० च्यावर आहे अशा ग्राम पंचायती.
  2. ज्या ग्रामपंचायती पर्यावरण संतुलीत समृध्द ग्रामयोजनेत सहभागी होउन त्या निकषाची पुर्तता करतील अशा  ग्रामपंचायतीमधुन जिल्हा नियोजन मंडळ प्राधान्यक्रम ठरवीलेल्या ग्रामपंचायती.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता:

  1. ज्या ग्रामपंचायतची लोकसंख्या ५००० च्या वर आहे अशा ग्राम पंचायती .
  1. ज्या ग्रामपंचायती पर्यावरण संतुलीत समृध्द ग्रामयोजनेत सहभागी होउन त्या निकषाची पुर्तता करतील अशा  ग्रामपंचायतीमधुन जिल्हा नियोजन मंडळ प्राधान्यक्रम  ठरवीलेल्या ग्रामपंचायती

योजने बाबतचे शासन निर्णय महाराष्ट्र शासन निर्णय क्र. व्ही.पी.एन. २६१० /प्र.क्र.१२९/ परा४/ ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुबंई ३२ दिनांक १६सप्टेबर २०१०


Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME