शालेय शिक्षण

योजनेचे नांव : १.प्राथमिक शाळेतील अनुसुचीत जाती / जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलती

कार्यान्वयन अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील विद्यार्थी आपल्या पालकांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमूळे शाळेत नियमित्त येवु शकत नाहीत. तसेच त्यांचे पालक शाळेचा गणवेश विकत घेवून देऊ शकत नाही त्यामुळे बरेच विद्यार्थी आपल्या पालकांना त्यांच्या दैनंदिन कामात मदत करतात. त्यामुळे गळतीचे प्रमाण वाढते पर्यायाने शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरतो. ही बाब लक्षात घेता गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी इयत्ता १ली ते ४थी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनु.जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश व लेखन साहित्याचे मोफत वाटप केले जाते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होते. सदर योजना १०३ विकास गटातील तालुके वगळून विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो .

योजनेचा लाभ कोणास घेता येतो.:  इ.१ली ते ४थी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या इयत्ता १ ली ते ४थी मधील अनुजाती/ जमाती  भटक्या जमाती व विमुक्त जातीतील नियमित विद्यार्थी ज्यांचे पालक दारिद्गय रेषे खाली आहेत अशा पालकांच्या पाल्याना लाभ घेता येतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता : इयत्ता १ ली ते ४थी मधील अनुजाती/ जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जातीतील विद्यार्थी शाळेत नियमित येणारे विद्यार्थी.

योजनेबाबतचेशासननिर्णय :   शासननिर्णयक्र. गणवेश२००३/प्र.क्र.१८/पैरा (२६) मंत्रालय,मुंबई३२, दि१५.०३.२००३.


योजनेचे नांव : २)१०३ विकास गटातील इ.१ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांना गणवेश व लेखनसाहित्य पुरवणे.

कार्यान्वयन अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील: जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील विद्यार्थी आपल्या पालकांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमूळे शाळेत नियमित्त येवु शकत नाहीत. तसेच त्यांचे पालक शाळेचा गणवेश विकत घेवून देऊ शकत नाही त्यामुळे बरेच विद्यार्थी आपल्या पालकांना त्यांच्या दैनंदिन कामात मदत करतात. त्यामुळे गळतीचे प्रमाण वाढते पर्यायाने शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरतो. ही बाब लक्षात घेता गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी इयत्ता १ली ते ४थी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुजाती/ जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश व लेखन साहित्याचे मोफत वाटप केले जाते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत होते.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो:  १०३ विकास गटातील इ.१ली ते ४थी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या इयत्ता १ ली ते ४थी मधील अनुजाती/ जमाती भटक्या जमाती व विमुक्त जातीतील नियमित विद्यार्थी ज्यांचे पालक दारिद्गय रेषेखाली आहेत अशा पालकांच्या पाल्याना लाभ घेता येतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता :  इयत्ता १ ली ते ४थी मधील अनुजाती/ जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जातीतील विद्यार्थी शाळेत नियमित येणारे विद्यार्थी.

योजने बाबतचे शासन निर्णय : शासन निर्णय क्र. गणवेश २००३/प्र.क्र.१८/पैरा ७ (२६) मंत्रालय, मुंबई३२, दिनांक १५.०३.२००३.


योजनेचे नांव : ३. समाजातील दुर्बल गटकातील मुलींना उपस्थिती भत्ता.

कार्यान्वयन अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील: प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याबाबतच्या धोरणानुसार प्राथमिक शाळेत जाणार्‍या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी इयत्ता १ली ते ४थी मधील शाळेत जाणार्‍या अनुसूचित जाती/जमाती, भटक्याजाती व विमुक्त जमातीतील विशेष मागासवर्गातील मुलींना प्रतिदिन १ रु. दराने मुलींच्या पालकांना उपस्थिती भत्ता देण्याची योजना

योजनेचा लाभ कोणास घेता येतो :  इ.१ली ते ४थी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या इयत्ता १ ली ते ४थी मधील अनुजाती/ जमाती  भटक्या जमाती व विमुक्त जातीतील, विशेष मागासवर्गातील मुलींना लाभ देण्यात येतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता : इ.१ली ते ४थी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या इयत्ता १ ली ते ४थी मधील अनुजाती/ जमाती भटक्या जमाती व विमुक्त जातीतील, विशेष मागासवर्गातील दारिद्गय रेषेखाली पालकांच्या विद्यार्थींनीना उपस्थिती भत्ता. दरमहा सरासरी उपस्थिती ७५% असुन अनिवार्य आहे

योजने बाबतचे शासन निर्णय :

  1. शासन निर्णय क्र.पीआरई१०९१/९६१४/प्राशि१/दि १०.१.९२
  2. शासननिर्णयक्र. पीआरई१०९९/(१८१३/९९)/प्राशि४/ दि१६..९९.

योजनेचे नांव :      ४.शाळेत उत्कृष्ट काम करणार्‍या प्राथमिक शिक्षकांना पूरस्कार.

कार्यान्वयन अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरणासाठी ६ ते ११ वयोगटातील शाळा बाहेरील मुलींची १००% पटनोंदणी व  ३५% उपस्थिती असलेल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्रोत्सहान मिळणेसाठी प्रत्येकी रोख रक्कम रुपये १००% व प्रशस्ती पत्र देण्यात येते.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकास लाभ घेता येतो

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता : इयत्ता १ली च्या मुलींची १००% पटनोंदणी व ९५% उपस्थिती असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे शिक्षक.  

योजने बाबतचे शासन निर्णय : शासन निर्णय क्र. पीआरई/७९८४(६०२९) प्रा.शि१ दि.१३.०६.१९८४.


योजनेचे नांव :      ५. प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्ती

कार्यान्वयन अधिकारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील: जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील वर्ग खोल्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांस बसण्या योग्य नाहीत अशा वर्ग खोल्या दुरुस्त करुन वापरात आणने पडझड झालेल्या वर्ग खोलीत शैक्षणिक वातावरण निर्माण होणे कठीण होते. चांगल्या वर्ग खोल्यात अध्ययन व अध्यापन प्रक्रिया परिणामकारक होते. त्यामुळे प्राथमिक शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक असते

योजनेचा लाभ कोणास घेता येतो :  दुरुस्ती योग्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग खोल्या.  

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता : कनिष्ठ अभियंता व गटशिक्षणाधिकारी यांचा वर्ग खोली दुरुस्ती बाबत अभिप्राय.

योजने बाबतचे शासन निर्णय :   शासन निर्णय क्र. जीवायो १००७/प्रक्र ३९/ का१४४४/ दि १६.०२.२००८.


Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME