क्रिडा

योजनेचे नांव :  १.युवक कल्याण एकत्रिकरण (सामजिक सेवा शिबीर भरविणे / ग्रामीण व नागरी भागातील स्वयंसेवी युवक मंडळांना आर्थिक सहाय्य.)

कार्यान्वयन अधिकारीः- जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : ग्रामीण व नागरी भागातील स्वयंसेवी संस्था सातत्याने कार्यरत राहण्यासाठी त्यांना या योजनातंर्गत दर वर्षी अर्थसहाय्य दिले जाते विविध उपक्रमाद्वारे राष्ट्र उन्नती व सामाजिक विकास करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. 

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : या योजनेतंर्गत युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणार्‍या पंजीबध्द संस्थाना अनुदान देण्यात येते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : या योजनेतंर्गत १५ ते ३५ वयोगटातील वकृत्व स्पर्धा, आयोजित करण्यात येतात त्याशिवाय वृक्षारोपन, रक्तदान, व्यसनमुक्ती, संगणक प्रशिक्षण शिबीर, इतर स्वंयरोजगार प्रशिक्षण शिबीरे  आयोजित केली जातात. 

योजनेबाबतचे शासन निर्णय :  क्र.वायडब्ल्यूपी/१०७८/१९९५/का१७ दि.१७०११९८०

 


योजनेचे नांव :  २.व्यायाम शाळा विकास.

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : समाजातील सर्व घटकांचा सर्वांगिण शारीरिक विकास साधण्यासाठी व्यायामशाळेंची सुविधा उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : या योजनेतंर्गत जी क्रीडा मंडळे / व्यायाम संस्था / तालमी १८६० च्या संस्था नोंदणी अधिनियमाखाली आणि १९५० च्या सार्वजनिक विश्वस्त अधिनियमाखाली नोंद झाली आहे अशा व्यायामसंस्था,क्रीडामंडळे व महिला मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका,जिल्हा परिषद इत्यादी संस्थाना अनुदान देण्यात येते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : या योजनेतंर्गत किमान ५०० चौ.फुट चटई क्षेत्र व्यायामगृह,स्नानगृह, भांडारगृह,इ.बाबींच्या बांधकामासाठी तसेच जुन्या नव्या व्यायामशाळा आखाडे तालमी यांच्या नुतणीकरणासाठी या शिवाय संस्थेकडे व्या शाळा उपलब्ध असेल तर व्यायामशाळेसाठी अत्याधुनिक साहित्य खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते व संस्थेकडे स्वतःच्या मालकीची  किंवा दिर्घ मुदतीचा करारावर (३३ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ) व्यायामशाळा बांधकामासाठी जागा असणे आवश्यक आहे.

योजनेबाबतचे शासन निर्णय :  क्रमांक राक्रीयो१०९६/प्र.क्र.३३०/क्रीयुसे१. दि.३१०७१९९७

 


योजनेचे नांव :  ३. क्रीडांगण विकास / तालुकास्तरावर प्रेक्षागार बांधणे.

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशील : नागरी, ग्रामीण व आदिवासी भागात क्रीडा विषयक विकासअतंर्गत क्रीडांगण कुंपन घालणे, ४०० व २०० मीटर धावनपट्टी तयार करणारे, क्रीडांगण समपातळीत करणे, विविध खेळांची क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, भांडारगृह, पिण्याच्या पाण्याची सोय करणे अशा प्रकारची कामे घेण्यात येतात.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : सदरील अनुदान खाजगी शैक्षणिक संस्थेद्वारा चालविण्यात येणार्‍या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच विविध खेळाच्या विकासासाठी कार्यरत असणारी विश्वस्त क्रीडा मडंळे, युवक मंडळे व महिला मंडळे यांना देण्यात येते व स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत चालविण्यात येणार्‍या प्राथमिक, माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांना देण्यात येते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : नागरी, ग्रामीण व आदिवासी भागात क्रीडा विषयक विकासअतंर्गत क्रीडांगण कुंपन घालणे, ४०० व २०० मीटर धावनपट्टी तयार करणरे, क्रीडांगण समपातळीत करणे, विविध खेळांची क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, भांडारगृह, पिण्याच्या पाण्याची सोय करणे अशा प्रकारची कामे घेण्यात येतात व संस्थेकडे स्वतःच्या मालकीची  किंवा दिर्घ मुदतीचा करारावर (३३ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ) क्रीडांगणासाठी राखीव असलेली किमान ३ एकर मोकळी जमीन आवश्यक आहे ही जमीन किमान २०० मीटरचा धावन मार्ग तयार करता येईल अशी सुयोग्य आकाराची व संलग्न असली पाहिजे व आदिवासी किंवा डोंगराळ म्हणून घोषित केलेल्या गावांसाठी २ एकर पर्यंत जमीन आवश्यक आहे.

योजनेबाबतचे शासन निर्णय : क्रमांक राक्रीयो१०९९/प्र.क्र.३३०/क्रीयुसे१. दि.३१०७१९९९


 

Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME