पाणीपुरवठा व स्वच्छता

योजनेचे नांव १.नळाव्दारे पाणी पुरवठा योजनेसाठी ग्राम पंचायतीना / जिल्हा परिषदांना अनुदाने  (राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्य हिस्सा)

कार्यान्वयन अधिकारी- का.अ.पाणीपुरवठा विभाग, जि.प.नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशील: जिल्हयात १५५१ गांवे ५०३ वाडी तांडे अशा एकूण २०५४ वस्ती आहेत. पैकी ९१४ गांवे व २४६ वाडी तांडयांना नळाव्दारे पाणी पुरवठा करण्यांत आला आहे. जिल्हयात ६३६५ हातपंप आहेत पैकी ४८४३ हातपंप चालू आहेत. जिल्हयात १६०१ विद्युत पंप असुन १४१५ चालु आहेत. जिल्हयात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ५२९ गांवे / वाडी तांड्‌यासाठी योजना हाती घेतल्या आहेत. पैकी ४२२ गांवे वाडी तांड्यामध्ये पाणी पूरवठा सुरु करण्यांत आला आहे. तसेच जिल्हयात ५२९ गांवे / वाडी तांड्‌या दूषीत पाणी असलेली आहेत. पैकी २६८ ठिकाणी शुध्द पाणी पुरवठा करण्यांत आला आहे. ग्रामीण भागातील जनतेस नळाव्दारे ४० लिटर प्रतिदिन प्रती माणसी  शुध्द पाणी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे संबंधीत गांवाकडून मागणी प्राप्त होताच नळ योजना घेण्याची कार्यवाही करण्यांत येते.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : ग्रामीण भागात ज्या ठिकाणी ४० लिटर प्रतिदिन प्रती माणसी शुध्द पाणी उपलब्ध होत नसलेली गांवे / वाडी तांडे

 1. लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अहर्ता
 2. गांवे / वाडयामध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता भासल्यास ग्राम पंचायतीने योजनेची मागणी करावी.
 3. ज्या गांवात योजना अस्तीत्वात आहे पंरतु पाणी पट्‌टीची वसूली न झाल्यामुळे ती बंद आहे. त्या गांवा करीता नविन योजना मंजूर करण्यांत येणार नाही.
 4. यापुर्वी ज्या योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. अशा योजनांचा एकुण देखभाल दुरुस्ती खर्च विचारात घेऊन वार्षीक पाणी पटटीची आकारणी करण्यांत यावी. दरवर्षी पाणी पट्‌टी मध्ये किमान ५% वाढ करण्यांत यावी. योजनेच्या देखभाल दुरुस्तीमध्ये तसेच वीज देयकामध्ये अनपेक्षीत वाढ झाल्यास त्या अनुषंगाने पाणी पट्‌टीच्या दरामध्ये वाढ करण्यात यावी.प्रस्ताव तयार करतांना संपूर्ण स्वच्छता अभियानातंर्गत संबंधीत गांव किमान ६०%       हगणदारी मुक्त असले पाहीजे सदर गांव टप्याटप्याने १००% हगणदारी मुक्त झाले       पाहीजे असे हमीपत्र ग्रामसभेच्या ठरावाव्दारे गांवाने सादर करावे आणि पुढे त्याप्रमाणे       अंमलबजावणी करावी. योजने करीता अनुदानाचा दुसरा हप्ता मिळण्यापूर्वी गांव      १००% हगणदारी मुक्त झाले पाहीजे.
 5. भूजलाच्या व्यवस्थापना करीता ग्राम पंचायतीने नागरिकांच्या सहभागातुन पाण्याचा         ताळेबंद तयार करुन पाण्याच्या स्त्रोतांच्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा.

प्रत्येक गांव कृती आराखडयामध्ये भूजल पुनर्भरणाशी संबंधीत आवश्यक उपाय योजना उदा. छतावरील पाऊस पाणी संकलन, विहीर पुनर्भरण इत्यादी शिवकालीन पाणी साठवन उपाय योजनांचा समावेश करणे बंधनकारक राहील.

 1. योजने बाबतचे शासन निर्णय
 2. शासन निर्णय क्रमांक ग्रापापु१०९९/प्र.क्र.३२८/पापु०७, दि.२७ जुलै २०००
 3. शासन निर्णय क्रमांक ग्रापापु१००१/प्र.क्र.१९०/पापु०७, दि.३ सप्टेंबर २००१
 4. शासन परिपत्रक क्रमांक ग्रापापु१००२/प्र.क्र.५३२/पापु०७, दि.२३ मार्च २००२
 5. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम बाबतच्या केंद्ग शासनाच्या मार्गदर्शक सुचना
 6. शासन निर्णय क्रमांक ग्रापाधो११०९/प्र.क्र.१०४/पापु०७, दि.१ ऑगस्ट २००९
 7. शासन निर्णय क्रमांक ग्रापाधो११०९/प्र.क्र.११५/पापु०७, दि.९ सप्टेंबर २००९
 8. शासन निर्णय क्रमांक ग्रापाधो११०९/प्र.क्र.१०४(अ)/पापु०७, दि.१७ मार्च २०१०
 9. शासन निर्णय क्रमांक ग्रापाधो११०९/प्र.क्र.१०४ (अ)/पापु०७दि.३०ऑगस्ट२०१०

योजनेचे नांव२.विद्युतपंप बसविणे / हातपंपाचे विद्युतपंपात रुपांतर करणे 

कार्यान्वयन अधिकारी का.अ.पाणीपुरवठा विभाग,जि.प.नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशील: बारमाही चालणार्‍या हातपंपावर सिंगल फेज विद्युतपंप बसवून दुहेरी पंपात रुपांतर करणे

योजनेचा लाभ कोणास घेता येतो: पाणी टंचाई असलेली गांवे / वाडी तांडे लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता विंधन विहीरीची पाणी उपलब्धता २८२० लिटर प्रतितास असावी किंवा बारमाही चालणारा हातपंप असावा.


योजनेचे नांवः ३.विंधन विहीरीचे जलभंजन करणे.

कार्यान्वयन अधिकारी : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, नांदेड.

योजनेचा संक्षिप्त तपशिलः पिण्याच्या पाण्या करिता मोठया प्रमाणात विंधन विहीरी घेण्यात येतात. या विंधन विहीरींची क्षमता भूस्तरातील जलवाहक भेगा व फटीतून होणाया पाण्याच्या संचारावर अवलंबून असते. कालांतराने खडकाची झिज होवून गाळामुळे या भेगा बूजल्या जातात व पाण्याची आवक कमी होऊन विंधन विहीरीची क्षमता कमी होते आणि क्षमता कमी झालेल्या विंधन विहीरीची क्षमता वाढविण्यासाठी विंधन विहीरीमध्ये उच्च दाबाखाली पाणी सोडून परिसरातील जलधारक खडकामधील भेगा व फटी स्वच्छ केल्या जातात. तसेच वाढविल्या जातात. त्यामुळे विंधन विहीरीची क्षमता वाढून नवीन विंधन विहीर घेण्याचा खर्च वाचविता येतो.

योजनेचा लाभ कोणास घेता येतोः सदर योजनेचा लाभ ग्रामपंचायतीस घेता येतो.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबीः सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत यांनी तशी रितसर मागणी करावी लागते व ५ टक्के लोकवर्गणी भरल्यानंतर विंधन विहीरीचे जलभंजन करुन देण्यात येते.


योजनेचे नांव   :    ४. संपूर्ण स्वच्छता अभियान

कार्यान्वयन अधिकारी :- उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)जि.प.नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिलᅠ : दूषित पाणी पुरवठा व उघडयावरील हगणदारीमुळे प्रादुर्भाव होणार्‍या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी लोकसहभागावर आधारीत संपूर्ण स्वच्छता अभियान केंद्ग शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. जिल्हयात यापूर्वी लोकसहभागावर आधारित पथदर्शी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्यामुळे नांदेड जिल्हयाची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हयात सन २००२ पासून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

केंद्ग शासनाचा ७०% निधी आणि राज्य शासनाचा ३०% निधी याप्रकल्पासाठी उपलब्ध करुन देण्यात येतो. या अंतर्गत उघडयावरील हागणदारीमुक्त गावांना निर्मल ग्राम पुरस्कार देऊन गौरविल्या जाते. आतापर्यंत नांदेड जिल्हयात १६६ ग्राम पंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला असून यावर्षी १६६ ग्राम पंचायती प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

योजनेचा लाभ कोणास घेता येतोग्राम पंचायत, दारिद्गय रेषेखालील कुटुंब, शाळा व अंगणवाडी


Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME