नगर विकास

योजनेचे नांव : मागास क्षेत्रा व्यतीरीक्त नागरी क्षेत्रातील सुधारणा (नागरी दलितेत्तर वस्तीची सुधारणा) 

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा प्रकल्प अधिकारी, नगर पालिका प्रशासन, नांदेड 

महाराष्ट्र शासन न.वि.वि. शा.नि.क्र.जिवायो/२०१०/प्र.क्र.२६/नवि४, मुंबई दि.८.२.२०११ च्या शासन निर्णयानुसार महानगरपालिका/नगपंचायती क्षेत्रामध्ये नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत.

शहरामध्ये नगरपरिषदा/ नगरपंचायतींना योजना राबविण्याकरिता, योजनेअंतर्गत घेण्यात येणारी कामे नियोजीत पध्दतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करुन पात्र भागासाठी पूरविण्यात आलेल्या नागरी सोयी, सुविधा याची सद्यःस्थिती दर्शविणारी माहिती तयार करणे तसेच नागरी सेवांची मानके विचारात घेता सर्व आवश्यक असणार्‍या नागरी सोई सुविधांच्या कामांचा प्रस्ताव नगर परिषद सर्वसाधारण सभेचा ठराव घेवून, नियोजन आराखडा ( ) कामांच्या यादीसह तयार करावा.

त्यामध्ये अशा वस्त्यासाठी आवश्यक पोच रस्ता व अंतर्गत रस्ते तसेच पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्य जलाचा निचरा, घनकचरा व्यवस्थापन, पथदिवे यासारख्या पायाभूत सुविधा सामाजिक सुविधा, समाजमंदीर, अंगणवाडी, इत्यादी कामे घेण्याकरीता प्रथम प्राधान्यक्रमाने कामे प्रस्तावित करता येतात.


योजनेचे नांव : २.महाराष्ट्र नगरोत्थान अभियान.

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा प्रकल्प अधिकारी, नगर पालिका प्रशासन, नांदेड 

योजनेचा संक्षिप्त तपशिल- महाराष्ट्र शासन, न.वि.वि, शा.नि.एमयुआर २०१० प्रक्र.३१७/१० नवि ३३ मुंबई दिनांक ०८ नोव्हेंबर २०१०, च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात नागरी पायाभूत व सामाजिक सुविधा निर्माण करणे व त्यांच्या बळकटीकरणासाठी जिल्हा योजनेंतर्गत महाराष्ट्र सुवर्णजयती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केले आहे.

या योजनेंतर्गत सर्व नागरी  स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आणि त्यात सुधारणा घडवून आणणे यासारख्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येते त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन पाणी पुरवठा, मल्लनिसारण व नागरी स्वच्छता, सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास, नागरी दळणवळण साधनांचा विकास, अपारंपारीक उर्जा स्त्रोत विकास, शालेय, तथा नागरी आरोग्याशी निगडीत पायाभूत सुविधांचा विकास व संकीर्ण कामे प्रस्तावीत करता येतात.

या योजनेंतर्गत अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात वरील पैकी कामे हाती घ्यावयाचे प्रकल्पाचे प्रस्ताव ढोबळ अंदाजपत्रका सोबत ठराव जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. प्राप्त अनुज्ञेय प्रस्तावाच्या आधारे उपलब्ध निधीतून अनुदान जिल्हा नियोजन समितीव्दारे देण्याची कार्यवाही करण्यात येते कामांचे तांत्रिक मूल्यमापन सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात येते.

  1. या योजनेच्या निकषानुसार सर्व नगरपरिषदांची (प्रकल्पाच्या मंजूर किमतीच्या) २०% हिस्सा भरणे बंधनकारक आहे. तसेच खालील सुधारणा कार्यक्रम मान्य करुन लागू करणे बंधनकारक राहील.
  2. व्दिनोंद लेखा पध्दतीचा अवलंब करणे.
  3. नगरपालिका यांच्या कामकाजाचे संगणकीकरण करणे.
  4. उचीत उपभोक्ता आकार वसुली सुधारणा करणे.
  5. गरीबांसाठी अर्थसंकल्प विवक्षित निधीची तरतुद करणे.
  6. मालमत्ता कर विषयक सुधारणा करणे.

योजनेचे नांव : ३. नगर परिषदांचा अग्निशमन सेवा व आणीबाणी सेवांचे बळकटीकरण करणे

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा प्रकल्प अधिकारी, नगर पालिका प्रशासन, नांदेड 

           महाराष्ट्र शासनाचे नगरविकास विभाग,शासन निर्णय क्र.अशस ं२०१०/प्र.क्र.१९९/नवि २०, दि १ जानेवारी २०११ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील मनपा/नगरपरिषदांमध्ये जिल्हा योजनेतुन महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (जिल्हास्तर) राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या आहेत.

            या योजने अंतर्गत सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अग्निशमन व आणिबाणीच्या सेवांचे बळकटीकरणासाठी पूरक उपकरणे खरेदी करणे व परिपत्रकानुसार विहीत केलेल्या तांत्रिक तपशीला प्रमाणे पोर्टेबल फायर फेस, जॅक्स, टुल्स कटींग मशीन वैगरे इत्यादी पूरक उपकरणे खरेदी करणे तसेच अग्निशमन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांची निवासस्थाने बांधणे, अग्निशमन केंद्ग व सेवा निवासस्थानासाठी आवश्यक जागेचा भुसंपादनाचा खर्च भागविणे आणि शहरात फायर हायड्रंट चे जाळी निर्माण करणे या कामासाठी अनुदान देण्यात येते.

            सर्व निकषाची पूर्तता झाल्याचे तपासल्यानंतरच जिल्हा नियोजन समितीकडून त्या त्या नगरपरिषदेला अनुदान देण्यात येते.


योजनेचे नांव : ४. विकास योजना राबविण्यासाठी अनुदान/ कर्जे 

कार्यान्वयन अधिकारी सहाय्यक संचालक, नगर रचना, नांदेड  

            नगर पालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील विविध कामांना या योजनेअंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामे पूर्ण करण्यासाठी अनुदान आणि कर्जे उपलब्ध करुन दिल्या जातात.


Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME