सामाजिक न्याय

योजनेचे नांव : १. शिक्षण फी  व परिक्षा फी प्रदाने 

कार्यान्वयन अधिकारी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड

योजनेचा संक्षिप्त  तपशील: शासन निर्णय दिनांक  २४.१२.२००० नुसार अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना वय व उत्पन्न विचारात न घेता सर्व स्तरातील मान्यता शिक्षणक्रमासाठी शुल्क माफी देण्यात येते. शुल्क माफी मध्ये पुढील शुल्कांचा अंतर्भाव होतो. प्रवेशशुल्क, शिक्षणशुल्क, सत्र शुल्क, वाचनालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, क्रीडा शुल्क, परिक्षा शुल्कची परिपूर्ती करण्यात येते. मावक, विजाभज या योजने अंतर्गत  सन २०१०११ या आर्थिक वर्षासाठी आहे.                                                    


योजनेचे नांव :२. तांडा वस्ती सुधार योजना

कार्यान्वयन अधिकारी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड

योजनेचा संक्षिप्त  तपशीलमहाराष्ट्रात भटक्या जमातीचे लोक अजूनही भंटकंती करुन स्थलातंरीत स्वरुपाचे जिवन जगातात तथापी लमाण / बंजारा या जमातीचे लोक तांडयामधुन अनेक वर्ष रहात असले तरी अशा तांडया व वसत्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामध्ये आधुनिकतेकडे कल असला तरी बहुसंख्य समाज गरीबीचे जिवन जगत आहे. तांडया मधील समाजास स्थिर जिवन जगता यावे यासाठी राज्यातील लमाण / बंजारा यांच्या तांडा विकासासाठी आणि तांडयाला मुख्य गांवाला जोडण्यासाठी तांडा वस्ती सुधार योजना राबविण्यात येते.

         दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर राज्यातील भटक्या समाजाच्या सुधारणेसाठी तांडा वस्ती सुधार योजना शासनाने २००३ पासून सुरु केली आहे.

योजनेचा लाभ कोणास घेता येतोः लमाण / बंजारा यांच्या तांडा विकासासाठी आणि तांडयाला मुख्य गांवाला जोडण्यासाठी तांडा वस्ती सुधार योजना राबविण्यात येते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता: या योजनेअंतर्गत

५० ते १०० लोकसंख्या रु.  ४,००,०००/

१०० ते १५० लोकसख्या रु. ६,००,०००/

१५१ च्या पुढील लोकसंख्येस १०,००,०००

या योजनेअंतर्गत वरील लोकसंख्येच्या प्रमाणात दर्शविलेले अनुदान मजूर करण्यात येते.

योजनेबाबतचे शासन निर्णय:शासन निर्णय क्रमांक इमाव २००८ / प्रक्र १८६/ मावक३ मंत्रालय मुंबई दि१६/१२/२००८


योजनेचे नांव :३. व्यावसायिक शिक्षण महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या वस्तीगृहामधील मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे. 

कार्यान्वयन अधिकारी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड

योजनेचे उद्देशः व्यवसाय पाठ्यक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना शैक्षणिक खर्च भागविता यावा, व्यवसाय पाठ्यक्रम शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून आर्थिक सहाय्य देणे व व्यावसायिक पाठ्यक्रम अभ्यासक्रम पूर्ण करुन त्यांनी स्वतःच्या पायावर उभे रहावे.

योजनेच्या अटीः विद्यार्थी हा वैद्यकीय/ अभियांत्रिकी/ पशुवैद्यकीय/ कृषी/ शिक्षण शास्त्र/ आयटीआय या अभ्यासक्रमाच्या पदविका/ पदवी/ पदव्युत्तर शिक्षण नियमित घेणारा असावा, विद्यार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये १.०० लाखपेक्षा कमी असावे, विद्यार्थ्याने व्यावसायिक पाठयक्रमात प्रवेश घेतलेला असावा, लाभधारक विद्यार्थी हा विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा व सदर विद्यार्थी हा शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळण्यास पात्र असावा. ज्या विद्यार्थ्यांना व्यावसाय पाठ्यक्रमात प्रवेश मिळाला आहे, विद्यार्थी  शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळण्यास पात्र आहे. परंतु शासकीय वस्तीगृह प्रवेश मिळाला नाही असे वस्तीगृहाबाहेर वास्तव्य करणारे विद्यार्थी.

योजनेचे स्वरुपः व्यवसायिक पाठ्यक्रमांचे संलग्न वस्तीगृहात राहणाया विद्यार्थींना सरासरी रुपये ५०० ते ७०० प्रति माह दहा महिण्यासाठी निर्वाह भत्ता दिला जातो व व्यवसायिक पाठ्यक्रमांत शिक्षण घेणार्‍या मात्र वस्तीगृहाबाहेर राहणाया विद्यार्थींना सरासरी रुपये ७०० ते १००० प्रमाणे दहा महिण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. 


योजनेचे नांव :४. विशेष/ इतर मागास वर्ग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती.    

कार्यान्वयन अधिकारी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड÷

योजनेचे उद्देशः शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे, विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे व उच्च शिक्षण घेण्याची आवड निर्माण करणे. विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

योजनेच्या अटीः विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा आणि विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील असावा. विद्यार्थी हा शासकीय/ अनुदानित/ विनाआनुदानित, कायम विना आनुदानित किंवा शासन मान्य शिक्षण संस्थेत शिकत असावा. विद्यार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये १.०० लाख मर्यादेत असावे,  विद्यार्थी हा शासनाने विहित केलेल्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता ११ वी पासून पुढे शिक्षण घेणारा असावा.

योजनेचे स्वरुपः  ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये १.०० लाख पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार शिक्षण शुल्क, परिक्षा श्‌ुल्क व इतर आवश्यक शुल्क दिले जाते. 


योजनेचे नांव :५. इयत्ता ८ वी ते १० वीमध्ये शिकणार्‍या विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

कार्यान्वयन अधिकारी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड÷

योजनेचे नांवः योजनेचे उद्देशः विजाभज/विमाप्र मुलींमध्ये शिक्षणांची आवड निर्माण करणे, मुलीचे शाळेतील उपस्थिती वाढवणे व गळतीचे प्रमाण कमी व्हावे व शिक्षणासाठी पालकांना आर्थिक सहाय्य व्हावे.

योजनेच्या अटीः विद्यार्थ्यांनी विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावी, विद्यार्थ्यांनी ही इ.८ वी ते १० मध्ये पूर्ण वेळ शिक्षण घेणारी असावी. यासाठी उत्पन्नांची अट नाही. लाभधारक मुलगी ही शासन मान्य संस्थेत शिकत असावी.

योजनेचे स्वरुपः प्रति विद्यार्थ्यांनी प्रतिमहा रु.१००/ या प्रमाणे १० महिण्यासाठी एकूण रु.१०००/  


योजनेचे नांव :६. इयत्ता ५ वी ते ७ वीमध्ये शिकणार्‍या विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलींकरीता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

कार्यान्वयन अधिकारी समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड  

योजनेचे उद्देशः विजाभज/विमाप्र मुलींमध्ये शिक्षणांची आवड निर्माण करणे, मुलीचे शाळेतील उपस्थिती वाढविणे व गळतीचे प्रमाण कमी व्हावे व शिक्षणासाठी पालकांना आर्थिक सहाय्य व्हावे.

योजनेच्या अटीः विद्यार्थ्यांनी विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावी, विद्यार्थ्यांनी ही इ.५ वी ते ७ मध्ये पूर्ण वेळ शिक्षण घेणारी असावी. या साठी उत्पन्नांची अट नाही. लाभधारक मुलगी ही शासन मान्य संस्थेत शिकत असावी.

योजनेचे स्वरुपः  प्रति विद्यार्थ्यांनी प्रतिमहा रु.६०/ या प्रमाणे १० महिण्यासाठी एकूण रु.६००/


योजनेचे नांव :७. विजाभजा व विमाप्र प्रवर्गातील माध्यमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

कार्यान्वयन अधिकारी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड÷

योजनेचे उद्देशः विजाभज/विमाप्र प्रवर्गाच्या मुला/मुलींना शिक्षणांची आवड निर्माण करणे, शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, विजाभज/विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी. 

योजनेच्या अटीः विद्यार्थी हा मान्यता प्राप्त संस्थेत शिक्षण घेत असावा, विद्यार्थी हा विजाभज व विमाप्र प्रवर्गातील असावा तसेच वार्षिक परिक्षेत ५० % पेक्षा जास्त गुण घेवून वर्गात प्रथम/द्वित्तीय क्रमांकांनी उत्तीर्ण असावा. 

योजनेचे स्वरुपः इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिक्षणार्‍या विद्यार्थ्यांना रु.२०/ प्रमाणे १० महिण्याला रु.२००/  व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिक्षणार्‍या विद्यार्थ्यांना रु.४०/ प्रमाणे १० महिण्याला रु.४००/ 


moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME