लघु पाटबंधार

योजनेचे नांव :  १. लघुपाटबंधारे  ० ते १०० हे. पर्यंतची कामे

कार्यान्वयन अधिकारी- कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद,नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल :

१) सिंचन तलाव :  तलावाच्या मुख्य भिंतीची लांबी शक्य तितके कमीतकमी ठेवुन जास्तीत जास्त पाणीसाठा निर्माण करणे हा आर्थीक दृष्ट्या परवडणारा मुख्य उद्देश तलाव बांधकाम करतेवेळी ठेवावा लागतो. तलाव गाळानी लवकर भरुन जाणार नाही यासाठी पाणलोट क्षेत्रातील माथा ते पायथ्या पर्यंत योग्य ते सर्व उपचार करणे आवश्यक असते. जेणे करुन तलावाचा उपयोग दिर्घकाळ करता येतो. तसे पाहता तलावातील गाळ काढणे खर्चीक असते, परंतु मोठे व मध्यम प्रकल्पांच्या तुलनेत १०० हे. सिंचन पर्यंतची लहान तलावातील गाळ काढणे सोपे असते.

         मागील तीन वर्षात नांदेड जिल्ह्यातील तलावातील गाळ काढण्याचे कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे तलावांचा पाणीसाठा पुर्नस्थापीत तर झालाच त्याच बरोबर तलावातील सुपीक गाळाच्या उपयोग ज्या ज्या शेतकयांनी केला त्यांचे शेती उत्पन्नात भरीव वाढ झाल्याचे दिसुन आले. त्यामुळे गत दोन वर्षाचा तुलनेत यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मजुराकरवी काढलेल्या गाळास शेतकयांची मागणी वाढल्याचे दिसुन येत आहे. यावर्षी शेतकरी स्वखर्चाने गाळाची वाहतुक करुन स्वतःच्या शेतात टाकुन घेताना दिसुन आले आहेत. शेतकयातील जागरुकता पाहता पुढील वर्षी शासनाला गाळाची किंमत ठरवावी लागते की काय असे वाटते.

      सिंचन तलावाच्या वैशिष्ठे असे की सदर तलावातील साठविलेले पाणी मुख्य कालव्याद्वारे व तेथुन वितरीका कालव्याद्वारे शेतींना पाणी दिले जाते. वास्तवीक शासन निर्णय ३० जुलै २००० अन्वये तलावाचे सिंचन व्यवस्थापन त्या तलावापासुन लाभ मिळणाया लाभार्थ्यानी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पाणी वापर संस्था मार्फत करणे आवश्यक आहे. पाणीपट्टी आकारणी ठरविणे, पाणीपट्टी वसुल करणे,  वसुल करण्यात आलेल्या  पाणीपट्टीतुन तलावांची व कालव्यांची  किरकोळ दुरुस्ती करणे पाणी वापर संस्थेच्या अधिकार क्षेत्रात येतात. परंतु पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी म्हणावे तसे लाभार्थी पुढाकार घेतांना दिसुन येत नाहीत. त्यामुळे तलावाच्या सिंचन क्षमतेच्या तुलनेत  प्रत्यक्ष सिंचन बयाच  प्रमाणात कमी आढळुन येते. याबाबत स्थानीक नेतृत्व पुढे आल्यास निश्चीतच यात सुधारणा होइल अशी आशा वाटते.

      सदर योजना राबवितांना याचा कमीत कमी ११ लाभार्थीना लाभ मिळणे आवश्यक आहे.  सदरयोजना लेखाशिर्ष २७०२६१९४ ल.पा ची कामे सर्वसाधारण  व २७०२४७७२ ल.पा ची कामे   व   अंतर्गत राबविण्यात येते. उपरोक्त  सर्वसाधारण लेखाशिर्ष अंतर्गत लाभार्थी हे सर्वसाधारण प्रवर्गातील असतात. तर शासन निर्णय क्रमांक टिएसपी२००३/प्रक्र १०१/का६ दिनांक २६.७.२००४ अन्वये   व  अंतर्गत लाभार्थी हे आदिवासी असणे आवश्यक आहे. ज्या आदिवासी क्षेत्रात योजनेचा लाभ १००% आदिवासी यांना होत नाही. अशा ठिकाणी किमान योजनेचा लाभ घेणाया आदिवासींची संख्या किमान ८०% असावी लागते.

       शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या मापदंडाच्या अधिन राहूनच सदर योजना राबविले जाते.

२) पाझर तलाव :   सदर योजना राबवित असतांना साधारणतः अशा भुस्तराची निवड केली जाते की ज्या मधुन अडविण्यात आलेले पाणी  भुगर्भात झिरपुन भुगर्भाच्या पाणी पातळीत वाढ होईल. पाझर तलावास कालव्याची सोय नसते. त्यामुळे याची प्रत्यक्ष सिंचन क्षमता सिंचन तलावाच्या  प्रचलीत नियमानुसार मोजता जरी येत नसली तरी, यामुळे होणारे अप्रत्यक्ष सिंचन मात्र आवश्य निदर्शनास येते.

       पाझर तलावाच्या खालील बाजूस झिरपलेल्या पाण्यामुळे सिंचन विहीरी, पाणी पुरवठा करणाया विहीरी, कूपनलीकांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होते. पाझर तलावाच्या बुडीत क्षेत्रातुन पाण्याच्या उपसा करुन सिंचन केले जाते. बयाच तलावातुन पाणी पाझरुन तलावाखालील शेती पाणथळ होण्याची शक्यता असते.  अशा वेळी काही योग्य उपचार करुन जमीन पाणथळ होण्यापासुन वाचविता येते. सदर योजनेतुन जमीनीत झिरपणाया पाण्यापासुन लाभ मिळणारे लाभार्थ्यांची संख्या आणि होणारा लाभ विचारात घेता पाझर तलावांचे महत्व मानवीजिवनात असाधारण आहे असेच म्हणावे लागेल. सिंचन तलावास लागु असणारे मापदंड या योजनेस पण लागु होतात.


योजनेचे नांव  : २.  कोल्हापुर पध्दतीचे बंधारे (० ते १०० हे.)

कार्यान्वयन अधिकारी का.अ.ल.पा.जि.प.नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल : लेखा शिर्ष २७०२६२०२ अंतर्गत को.प.बंधायांची कामे हाती घेतली जातात.  ग्राम विकास व जलसंधारण विभाग परिपत्रक क्रमांक संकीर्ण १००२/ प्रक्र ३१०/जल१ दिनांक ०६.०९.२००४ अन्वये २० हेक्टर पेक्षा जास्त सिंचन क्षमतेचे गेटेड को.प.बंधारे कार्यान्वीत  करता येतात. सदर योजना कार्यान्वीत करण्यासाठी शासन निर्णय दिनांक ३१ जुलै २००० अन्वये लाभार्थ्यांची संख्या किमान ११ असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण व आदिवासी उपयोजना तसेच ओटीएसपी अंतर्गत ही योजना कार्यान्वीत करता येते.

      को.प.बंधायामुळे सिंचन त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय होते. को.प.बंधायाचे गेट साधरणतः पावसाळ्यानंतर टाकुन पाणी अडविले जाते. बंधायांचे पाणी रब्बी हंगामास उपयोगी पडते. को.प.बंधांयांचे किरकोळ देखभाल दुरुस्ती, गेट टाकणे व गेट काढणे आदि कामे लाभार्थींच्या पाणी वापर संस्थे मार्फत करणे अपेक्षित आहे. गतवर्षी जिल्हयातील को.प.बंधायाचे गेट टाकुन पाणी अडविल्यामुळे पाण्याची पातळी वाढुून पाणी टंचाई भासली नाही.


योजनेचे नांव : ३. कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे १०१ ते २५० हेक्टर 

कार्यान्वयन अधिकारी कार्यकारी अभियंता, ल.पा.(स्था.स्तर)  विभाग, नांदेड.

योजनेचे उद्देशः लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागामार्फत १०१ ते २५० हे. सिंचन क्षमता प्रकारातील कोल्हापूरी पध्दती बंधारे या योजना देखील राबविण्यात येतात. या योजना राबविण्यापुर्वी  या योजनांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येते. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे नदी/ नाल्यावर पुल देखील उपलब्ध होतो. दोन पिअरमधील अंतरामध्ये बर्गे () बसविण्यात येऊन पाणी आडविण्यात येते. सर्वसाधारणपणे १५ सष्टेबरच्या नंतर गेट बसविण्यात येतात व मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात गेट काढण्यात येतात. पावसाळयात या योजनांचे गेट लावलेले ठेवू नये, असे शासनाचे आदेश असुन त्यानुसार कार्यवाही करण्यात येते. या योजनेमध्ये बहुतांशवेळा भुसंपादनाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी उपलब्धता, भुर्गभागातील पाणी पातळी वाढणे परिसरातील विहिरींना पाणी वाढण्यासाठी प्रभावी योजना होय.


योजनेचे नांव : ४. लघुपाटबंधारे योजना (१०१ ते २५० हेक्टर)

कार्यान्वयन अधिकारी कार्यकारी अभियंता, ल.पा.(स्था.स्तर)  विभाग, नांदेड.

योजनेचे उद्देशः लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागामार्फत १०१ ते २५० हे. सिंचन क्षमतेच्या  लघु पाटबंधारे योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे १०१ ते २५० हे. सिंचन क्षमता निर्माण होते. त्यापुर्वी या योजनेचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येऊन अंदाजपत्रक तयार करण्यात येते. या अंदाजपत्रकामध्ये सदर ठिकाणी किती पाणी उपलब्ध होऊ शकले याबाबत आकडेमोड केली जाते त्यानुसार पाणी साठवण होण्यासाठी लघु पाटबंधारे योजनेच्या अंदाजपत्रकामध्ये संकल्पन करुन माती धरणाची उंची, बाजुंचा उतार, सांडवा लांबी इत्यादी व इतर बाबीचे संकल्पन केले जाते व सदर योजना या ठिकाणी लाभदायी आहे किंवा नाही तसेच शासनाचे प्रचलीत मापदंडात बसते अथवा नाही हे देखील तपासले जाते.

या योजनेमुळे परिसरातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न निकाली निघतो तसेच भुर्गभागातील पाण पातळी वाढण्यासाठी ही योजना प्रभावी ठरते.


योजनेचे नांव : ५. लघुपाटबंधारे योजनेचे सर्वेक्षण करणे 

कार्यान्वयन अधिकारी कार्यकारी अभियंता, ल.पा.(स्था.स्तर)  विभाग, नांदेड.

योजनेचे उद्देशः लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागामार्फत ० ते १०० व १०१ ते २५० हे. सिंचन क्षमतांच्या योजना राबविण्यात येतात. या योजना राबविण्यापुर्वी या योजनांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येते. सर्वेक्षण करीत असतांना पाया () साठीचा कठीण खडकाची तपासणी करण्यासाठी बोअर घेण्यात येतात. तसेच   देखील घेण्यात येतात. समतलन यंत्राद्वारे प्रस्तातिव योजनेच्या विविध ठिकाणांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येते. त्याद्वारे योजनेमध्ये साठवण होणारे पाणी योजना लाभदायी आहे अथवा नाही? याबाबत कळते. सविस्तर सर्वेक्षणाशिवाय अंदाजपत्रक तयार करणे अशक्य असल्याने सर्वेक्षण देखील महत्वाचेच.


 

Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME