सामान्य व आर्थिक सेवा

योजनेचे नांव :  १.ग्रामीण तिर्थ क्षेत्र विकास ( यात्रा स्थळांचा विकास )

कार्यान्वयन अधिकारी- का.अ.बाधंकाम विभाग जि.प.नांदेड (दक्षिण व उत्तर)

योजनेचे संक्षिप्त तपशिल :  या  योजने अंतर्गत जिल्हयातील *क* वर्गीय तिर्थक्षेत्र (यात्रा स्थळ) च्या ठिकाणी विकासाची कामे हाती घेण्यांत येतात. या मध्ये  प्रामुख्याने तिर्थस्थळांच्या ठिकाणी भेटी देणाया भावीकांना मुलभुत सोई सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. तिर्थस्थळांच्या ठिकाणी प्रामुख्याने भक्त निवास बांधकाम/ सभागृह बांधकाम, वहानतळ, स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, पथदिवे, जोडरस्ता, संरक्षण भिंत, इत्यादी कामे हाती घेतली जातात. जिल्हा नियोजन समितीकडुन उपलब्ध होणाया निधीतुन टप्या टप्याने तिर्थक्षेत्राचे ठिकाणी भाविकांना सोई सुविधा पुरविण्यांत येतात.

योजने बाबतचा शासन निर्णय :   महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग परिपत्रक क्रमांक विकास/२००८/प्र.क्र.५००/ योजना७ दिनांक १६.२.२००८.


योज­नेचे नांव        : २. थोर व्यक्ती व  राष्ट्रपुरूषांचे पुतळे/स्मारके यांचे बाधंकाम

कार्यान्वयन अधिकारीकार्यकारी- अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग, ­नांदेड

योज­नेचा संक्षिप्त तपशिल : शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पामुळे निर्माण होणारा विस्तीर्ण जलाशय, मनाला भावणारे नदीचे चंद्गाकार रूप, नदीतीरावरील हिरवाई, किनार्‍यावरील पुरातन देवालय देवालयाजवळ दगडीघाट यामुळे हा परीसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. लगतच शंकर सागर जलाशय असुन मंदीरालगत दोन मोठे नैसर्गीक नाले व नदीचा विहंगम त्रीवेणी संगम आहे. यामुळे हे तिर्थक्षेत्र दिवसेन दिवस नांदेड व आसपास परिसरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्ग बनत आहे.

            मराठवाडयाचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या भगीरथ प्रयत्नांनी प्रकल्प साकारला गेला असुन या थोर नेत्याच्या द्गष्टेपणाच्या कृतज्ञे स्वरुप या जलाशयास महाराष्ट्र शासनाने   शंकर सागर असे नांव दिले आहे.

             शंकर सागर जलाशयात नदीच्या मध्य भागी मा.शंकररावजी चव्हाण यांचा पुतळा बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.


योजनेचे नांव – ३ पर्यटन स्थळांचा विकास

योज­नेचा संक्षिप्त तपशिल: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडील दि.८.११.९६ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील नागरी व ग्रामीण भागातील अनेक प्रसिध्द यात्रा स्थळे, ऐतिहासिक, सांस्कृतिक,निसर्गरम्य स्थळे, स्मारके विकसीत करण्यासाठी अशा पर्यटन केंद्राची अ,ब,क अशा तीन श्रेणीमध्ये वर्गवारी करण्यात येते यापैकी ‘ क ‘ श्रेणीमधील जिल्हास्तरावरील स्थानिक महत्व असलेली ठिकाणे विकसीत करण्यासाठी या योजनेतून तरतूद करण्यात येते.

          नांदेड जिल्हयात एकुण १६ तालुके असुन जिल्हा नियोजन समितीने  घोषित केलेल्या * क* दर्जा पर्यटनस्थळांची यादी परिशिष्टात माहितीस्तव जोडण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन समितीकडुन उपलब्ध होणाया निधीतुन टप्या टप्याने  पर्यटनस्थळाच्या ठिकाणी  भाविकांना सोई सुविधा पुरविण्यांत येतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME