नियोजन

योजनेचे नांव :  १. जिल्हा नियोजन समितीचे बळकटीकरण.

कार्यान्वयन अधिकारी - जिल्हा नियोजन अधिकारी, नांदेड

योजनेचे संक्षिप्त तपशिल :  जिल्हा नियोजन समिती च्या कामाचा वाढता व्याप लक्षात घेता,  कामकाज नियमितपणे व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध साहित्य सामु्‌ग्री पुरवठा इ. तसेच कार्यालयातील कर्मचायांना कामकाजासाठी आधुनिक सोयीसुविधा इ. उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने जिल्हा नियोजन समितीचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत काही प्रमाणात तरतूदी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या आवश्यक असलेल्या अनुषंगीक बाबीवर शासनाच्या अनुज्ञेयानुसार खर्च करण्यात येतो. 


योजनेचे नांव :  २. नाविन्यपूर्ण योजना. 

योजनेचे संक्षिप्त तपशिल : राज्यातील जिल्ह्यामध्ये विविधता असून प्रत्येक विभागाच्या/ जिल्ह्याच्या समस्या व गरजा वेगवेगळया आहेत. सबब, जिल्हा योजनेचा आराखडा तयार करतांना नियमित योजनांबरोबरच त्यात्या विभागाच्या अडीअडचणी दूर करुन गरजा पूर्ण करण्यास वाव राहवा, तसेच स्थानिक स्तरावर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना काही नविन योजना राबविण्याची संकल्पना असल्यास त्या राबविण्यास वाव असावा या उद्देशाने शासनाने नाविन्यपूर्ण योजनांची संकल्पना सुरु केलेली आहे. एकूण जिल्हा नियतव्ययाचा कमाल ४.५ टक्के इतका नियतव्यय राखुन ठेवण्याच्या सुचना आहेत. या योजनेअंतर्गत शासनाने काही अनुज्ञेय नाविन्यपूर्ण योजनाच्या यादीनुसार कामे घेणे अपेक्षित आहे.   


योजनेचे नांव :  ३. मुल्यामापन, सनियंत्रण व डाटा एन्ट्री

कार्यान्वयन अधिकारी - जिल्हा नियोजन अधिकारी, नांदेड

योजनेचे संक्षिप्त तपशिल : जिल्हा नियोजनाच्या व्याप्ती व आकरमानामध्ये वाढ झालेली आहे. मात्र जिल्हा नियोजन समिती कार्यालयात अतिरिक्त कर्मचारीवर्ग निर्माण करण्यामध्ये अडचणी आहेत. काही ठिकाणी व्यवासायीक व्यक्ती/ संस्थाकडुन डिझाईन (आराखडे) तयार करुन घेणेची आवश्यकता असेत. तसेच योजनांतर्गत खर्चाची परिणामता/ उपयोगिता तपासण्यासाठी वेळोवेळी योजनांचे मुल्यमापन ही करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. या बाबी संबंधात सर्व जिल्ह्याची गरज लक्षात घेवून अशा बाबीसाठी  जिल्ह्याने एकूण मंजूर नियतव्ययाचा कमाल ०.५ टक्के इतका नियतव्यय मुल्यामापन, सनियंत्रण डाटा एन्ट्री इत्यादीसाठी खर्च करण्याच्या सुचना आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME