रचना व कार्यपद्धती

जिल्हा नियोजन समितीची रचना

1)  सदस्य  संख्या :-

 • वीस लाखापेक्षा अधिक नसेल इतकी लोकसंख्या असलेल्या जिल्हयांच्या बाबतीत या जिल्हा नियोजन समितीमध्ये 30 सदस्यांचा समावेश असेल.
 • वीस लाखापेक्षा अधिक परंतू तीस लाखापेक्षा अधिक नसेल इतकी लोकसंख्या असलेल्या जिल्हयांच्या बाबतीत या जिल्हा नियोजन समितीमध्ये 40 सदस्यांचा समावेश असेल.
 • तीस लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्हयंाच्या बाबतीत या जिल्हा नियोजन समितीमध्ये 50 सदस्यंाचा समावेश असेल.

2)  पदसिध्द सदस्य :-  

 •  जिल्हयाचे प्रभारी मंत्री,
 • जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,
 • जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

3) नामनिर्देशित सदस्य :-

 • राज्यपाल, संबंधित प्रदेशाच्या सांविधिक विकास मंडळाच्या सदस्यांमधून एका सदस्यास, त्यांचा प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशित करतील.
 • राज्य शासन, महाराष्ट्र राज्य विधी मंडळाच्या व संसदेच्या सदस्यांमधून सर्वसाधारणपणे, जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रामध्ये वास्तव्य असलेल्या किंवा त्या क्षेत्रामधून निवडून आलेल्या सदस्यांमधून दोन सदस्य  नामनिर्देशित करील.
 • राज्य शासन, पदसिध्द सदस्य आणि खंड (अ) आणि (ब) अन्वयें नामनिर्देशित केलेल्या सदस्यांव्यतिरिक्त,जिल्हा नियोजन संब्ंाधी ज्ञान असलेले सदस्य नामनिर्देशित करील. या सदस्यांची संख्या 40 सदस्य असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बाबतीत दोन सदस्य आणि पन्नास सदस्य असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्याबाबतीत चार सदस्य अशी असेल.
 • खंड (ब) किंवा (क) अन्वयें नामनिर्देशित केलेला जिल्हा नियोजन समितीचा सदस्य हा मंत्री असेल तर अशा सदस्यास, समितीचा सह अध्यक्ष म्हणून पदनिर्देशित करण्यात येईल.

4) निवडून दिलेले सदस्य :-

जिल्हा नियोजन समितीमधील सदस्यांच्या एकूण संख्येच्या चार पंचमांशापेक्षा (4/5) कमी नसतील इतके सदस्य हे, जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रांची लोकसंख्या व नागरी क्षेत्राची लोकसंख्या यांच्यामधील गुणोत्तर प्रमाणात, जिल्हा पातळीवर पंचायतीच्या (जि.प.) व जिल्हयामधील नगरपालिकांच्या निर्वाचित सदस्यांनी त्यांचेमधून निवडलेली असतील. यानुसार निवडून दिलेल्या 4/5 सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे असेल :-

 • वीस लाखांपेक्षा अधिक नसेल इतकी लोकसंख्या असलेल्या जिल्हयाच्या बाबतीत या जिल्हा नियोजन समितीमधील 30 सदस्यांपैकी 4/5 सदस्य म्हणजे 24 सदस्य हे निवडून दिलेले सदस्य असतील.
 • वीस लाखापेक्षा अधिक परंतू तीस लाखापेक्षा अधिक नसेल इतकी लोकसंख्या असलेल्या जिल्हयाच्या बाबतीत या जिल्हा नियोजन समितीमधील 40 सदस्यांपैकी 4/5 सदस्य म्हणजे 32 सदस्य हे निवडून दिलेले सदस्य असतील.
 • तीस लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्हयाच्या बाबतीत या जिल्हा नियोजन समितीमधील 50 सदस्यांपैकी 4/5 सदस्य म्हणजे 40 सदस्य हे निवडून दिलेले सदस्य असतील. या संदर्भातील निवडणूकीची कार्यपध्दती आणि इतर बाबी अधिनियमातील तरतूदीनुसार व वेळोवेळी स्वतंत्रपणे  निर्गमित केलेल्या सुधारणांनुसार  असतील.

5)  विशेष   निमंत्रित :-

 • राज्य शासनाने परिच्छेद दोन अन्वयें नामनिर्देशित केलेल्या सदस्यांव्यतिरिक्त असलेले आणि जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे वास्तव्य असलेले किंवा त्याक्षेत्रामधून निवडून आलेले संसद सदस्य आणि महाराष्ट्र राज्य विधी मंडळाचे सदस्य.
 • जिल्हयाचा विभागीय आयुक्त,
 • जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी,
 • विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (नियोजन)
 • जिल्हा नियोजन अधिकारी आणि
 • जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षांशी विचारविनिमय करुन राज्य शासन, जिल्हा नियोजनचा अनुभव असलेल्या व सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या 10, 12 आणि 15 व्यक्तींना विशेष निमंत्रित म्हणून अनुक्रमे 30, 40 आणि 50 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित करील.

6) जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष व सदस्य सचिव :-

 • जिल्हयाचा प्रभारी मंत्री हा, जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असेल व त्या जिल्हयंाचा जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन समितीचा सदस्य-सचिव असेल.
 • जिल्हा नियोजन समितीच्या कोणत्याही बैठकीत अध्यक्ष गैरहजर असल्यास, समितीचे सदस्य बैठकीचा अध्यक्ष म्हणून काम पाहण्यासाठी आपल्यातील एकाची अध्यक्ष म्हणून निवड करु शकतील.

जिल्हा नियोजन समितीची कार्ये

7)  जिल्हा नियोजन समितीची कार्ये खालीलप्रमाणे असतील :-

 • जिल्हयातील पंचायतीनी आणि नगरपालिकांनी तयार केलेल्या योजना / गरज विचारात घेणे आणि संपूर्ण जिल्हयाकरिता विकास योजनेचा मसुदा तयार करणे.
 • पंचायतीनी आणि नगरपालिकांनी तयार केलेल्या पंचवार्षिक योजना / गरज विचारात घेणे आणि संपूर्ण जिल्हयासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे.
 • जिल्हा वार्षिक योजनेचा प्रगतीचा आढावा घेणे आणि संनियंत्रण करणे आणि राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजूर तरतूदीचे पुनर्विनियोजन करण्याची सूचना करणे.
 • विकास योजनेच्या मंजूर मसु’ाची अध्यक्षांमार्फत राज्य शासनाकडे शिफारस करणे.
 • संविधानाच्या अनुच्छेद 243 झेड डीच्या खंड (3) च्या तरतूदीचे अनुपालन केले जात असल्याची निश्चिती करणे.
 • तसेच अधिनियमातील तरतूदींतर्गत व स्वतंत्रपणे वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांतर्गत समाविष्ट असलेली कामे करणे.

8) जिल्हा नियोजन समितीच्या बैठका :-

 • जिल्हा नियोजन समितीच्या बैठका एका वित्तिय वर्षात चारपेक्षा जास्त घेण्यात येऊ नयेत.
 • या बैठका जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात याव्यात. तसेच या बैठका कोणत्याही धार्मिक स्थळी आयोजित करण्यात येऊ नयेत.
 • संसदेच्या/विधानमंडळाच्या अधिवेशन काळात जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आयोजित करु नयेत.
 • जिल्हा नियोजन समितीच्या सर्व सदस्यांना बैठकीचे निमंत्रण व त्या संबंधीची कागदपत्रे पुरेसा अवधी राखून प्राप्त होतील या बेताने पाठवावीत.
 • जिल्हा नियोजन समितीची जी व्यक्ती सदस्य नाही (विशेष निमंत्रित वगळून) तीला या समितीच्या बैठकांना आमंत्रित करु नये.
 • जिल्हा नियोजन अधिकारी हे नियोजनाच्या प्रक्रियेतील महत्वाचे अधिकारी असल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका जिल्हाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करुन आयोजित करणे व प्रत्येक बैठकीस जिल्हा नियोजन अधिका-यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

9) जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना मिळणारे भत्ते :-

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना उपस्थित राहिल्याबद्दल समितीच्या सदस्यांना मानधन अथवा मोबदला अथवा फी अनुज्ञेय असणार नाही.परंतू शासन परिपत्रक,वित्त विभाग क्र.प्रवास1488/प्र.क्र.85 / सेवा 5, दि.14.3.1988 नुसार प्रवास / दैनिक भत्ता पुढीलप्रमाणे देय राहिलः-

अ) जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित / अशासकीय सदस्यांना प्रवासभत्ता व दैनिक भत्ता, मुंबई नागरी सेवा नियम खंड 2 मधील परिशिष्ट- 42 (ए) यातील सेक्शन-1 मधील 1 (1) (बी) च्या तरतूदीनुसार तसेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम (वेळोवेळी सुधारल्याप्रमाणे) तसेच त्यांना लागू असलेले कायदे व नियम यानुसार अनुज्ञेय असलेला प्रवासभत्ता व दैनिकभत्ता घेण्यास ते पात्र राहतील. त्यानुसार शासन निर्णय, वित्त विभाग क्र.टीआरए-1477/1032/सी/एसईआर-5, दि.23.9.1977 व क्र.टीआरए – 1083/1426/एसईआर-5, दिनांक 1 फेब्रुवारी 1984 च्या आधारे नियमित केला जावा या नियमाच्या तरतूदी केवळ रेल्वे / सडक प्रवासासाठी लागू असल्यामुळे नामनिर्देशित / अशासकीय सदस्यांना विमान प्रवास तसेच रेल्वेच्या वातानुकूलित प्रथम वर्गाचा प्रवास अनुज्ञेय असणार नाही. दैनिक भत्याच्या दरात शा.नि.वि.वि.क्र.प्रवास-1092/ सीआर-59/सेवा-5,दिनांक-1.4.1992 अन्वयें सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार दैनिक भत्ता देय राहिल. ब)जिल्हा नियोजन समितीवर निवडणूकीने निवडून आलेल्या सदस्यांना व शासनाने नामनिर्देशित केलेल्या आणि विशेष निमंत्रितांमधील खासदार व आमदार यांचा प्रवासभत्ता / दैनिकभत्ता शा.नि.वि.वि.क्र. टीआरए-1470/131/अठरा,दि.27/1/1971 अन्वयें विधानमंडळाच्या कामकाजासाठी खासदार व आमदार यांना अनुज्ञेय असलेल्या व वेळोवेळी सुधारित होणा-या दराप्रमाणे निश्चित केली जावा.

10) जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना माहिती मिळविण्याचा हक्कः-

 जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांचेकडून आवश्यक असणारी सांख्यिकी व इतर माहिती प्राप्त करुन घेण्याची परवानगी असेल. सदस्य सचिवांनी ही माहिती संबंधित अधिका-यांकडून प्राप्त करुन घेऊन समितीच्या सदस्यांना पुरवावी.

11) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील निर्णय :-

जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले असल्यास, आवश्यक वाटल्यास सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी एखादे पत्रक प्रसिध्द करण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची प्रसिध्दी बैठक संपल्यानंतर एखादी पत्रकार परिषद बोलावून देण्यास हरकत असणार नाही. तथापि प्रसिध्दीसाठी पत्रक काढणे किंवा पत्रकारांची बैठक घेणे या गोष्टी संबंधित जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षांच्या स्वेच्छा निर्णयावर सोपविण्यात याव्यात.

जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले असल्यास, आवश्यक वाटल्यास सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी एखादे पत्रक प्रसिध्द करण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची प्रसिध्दी बैठक संपल्यानंतर एखादी पत्रकार परिषद बोलावून देण्यास हरकत असणार नाही. तथापि प्रसिध्दीसाठी पत्रक काढणे किंवा पत्रकारांची बैठक घेणे या गोष्टी संबंधित जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षांच्या स्वेच्छा निर्णयावर सोपविण्यात याव्यात.

12) नांदेड जिल्ह्याच्या, जिल्हा नियोजन समितीची रचना :-

नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 28.76 लाख आहे. नांदेड जिल्हा नियोजन समितीमध्ये एकूण 32 सदस्य आहेत. (1998 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 24  चे पान क्र.592 प्रकरण दोन (3) (2) (एक) अन्वये) तसेच महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम 2000 अन्वये नांदेड जिल्हा नियोजन समितीची सदस्य संख्या खालीलप्रमाणे असेल

1) पदसिद्घ सदस्य —

 • जिल्ह्याचा प्रभारी मंत्री (पालकमंत्री ) – अध्यक्ष
 • जिल्हा परिषदेचा अध्यक्ष           – सदस्य
 • जिल्हाधिकारी                    – सदस्य सचिव,

             एकूण – 3 सदस्य

2) नामनिर्देशित सदस्य –

 • मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे प्रतिनिधी (एक)
 • विधीमंडळ सदस्यांपैकी शासनाने नामनिर्देशित केलेले (दोन)

            1) मा.आमदार, विधानसभा मतदारसंघ

           2) मा.खासदार लोकसभा मतदारसंघ

 •  नियोजनाचा अनुभव / ज्ञान असलेले (दोन)

          एकूण – 5 सदस्य

3) निवडून दिलेले सदस्य –

 • जि.प.सदस्यांमधून                              24
 • महानगरपालीका/नगरपरिषदांच्या              8

सदस्यांमधून                                       ———————

  एकूण –                                             40 सदस्य

वर दिलेल्या सदस्यांव्यतिरीक्त खालील निकषांप्रमाणे व्यक्ती समितीवर विशेष निमंत्रित म्हणून असतील.

4)वरील 2 मध्ये नामनिर्देशित केलेले दोन विधीमंडळ सदस्याव्यतिरीक्त जिल्हा नियोजन समितीच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य असलेले किंवा निवडून आलेले संसद सदस्य आणि राज्य विधीमंडळ सदस्य

1)       खासदार, नांदेड लोकसभा मतदारसंघ

2)       खासदार, हिंगोली लोकसभा मतदारसंघ

3)       खासदार, लातूर लोकसभा मतदारसंघ

4)       आमदार, विधानपरिषद सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ

5)       आमदार, विधानपरिषद सदस्य पदवीधर मतदारसंघ

6)       आमदार, विधानपरिषद सदस्य शिक्षक मतदारसंघ

7)       आमदार, नांदेड-दक्षिण  विधानसभा मतदारसंघ

8)       आमदार, नांदेड-उत्तर विधानसभा मतदारसंघ

9)       आमदार, भोकर विधानसभा मतदारसंघ

10)   आमदार, किनवट विधानसभा मतदारसंघ

11)   आमदार, हदगांव विधानसभा मतदारसंघ

12)   आमदार, लोहा विधानसभा मतदारसंघ

13)   आमदार, मुखेड विधानसभा मतदारसंघ

14)   आमदार, देगलूर विधानसभा मतदारसंघ

15)   आमदार, नायगांव विधानसभा मतदारसंघ

16)   जिल्ह्याचे विभागीय आयुक्त,

17)   जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी

18)   जिल्हा नियोजन अधिकारी राज्य नियोजन मंडळाच्या सदस्यांपैकी एक नामनियुक्त प्रतिनिधी

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME